T20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंड चॅम्पियन बनला. 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 19 षटकांत हे लक्ष्य गाठले आणि सामना सहज जिंकला आणि दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 49 चेंडूत सर्वाधिक 52 धावा केल्या, तर कर्णधार जोस बटलरने 26 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून हारिस रौफने दोन आणि आफ्रिदी-शादाब-वसिम ज्युनियरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
#T20 #वशवचषक #मधय #इगलड #चमपयन