- दुसऱ्या कसोटीसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना मोफत प्रवेश
- प्रेक्षकांना प्रवेशासाठी CNIC किंवा B फॉर्म आणावा लागेल
- मायदेशात कसोटी मालिकेत पाकिस्तानची सर्वात खराब कामगिरी
२ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. रिकाम्या स्टेडियममुळे हैराण झालेल्या पीसीबीने दुसऱ्या कसोटीसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2 ते 6 जानेवारी दरम्यान नॅशनल बँक क्रिकेट एरिना कराची येथे न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य केला आहे. ज्या प्रेक्षकांना कसोटी सामना बघायचा आहे त्यांना प्रवेशासाठी CNIC किंवा B फॉर्म आणावा लागेल. ते कोणत्याही स्टँडमधून सामना विनामूल्य पाहू शकतील.
मायदेशात कसोटी मालिकेत पाकिस्तानची सर्वात खराब कामगिरी
याआधी पाकिस्तानने इंग्लंडला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत धूळ चारली होती. दरम्यान खराब खेळपट्ट्यांमुळे पीसीबीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.
यावर्षी पाकिस्तान संघाला घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. त्यांना चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मायदेशात कसोटी मालिकेत पाकिस्तानची सर्वात खराब कामगिरी.
#PAK #रकमय #सटडयमवर #PCB #न #घतल #मठ #नरणय