- पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 सामन्यात 51 च्या सरासरीने 1991 धावा केल्या.
- बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 2000 धावा पूर्ण करणारा पुजारा सहावा फलंदाज ठरला.
- याआधी केवळ तेंडुलकर, लक्ष्मण आणि द्रविड हे पराक्रम करू शकले
भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कसोटी विक्रम असून त्याने अहमदाबाद कसोटीदरम्यान कांगारू संघाविरुद्ध आणखी एक विशेष कामगिरी केली. पुजाराने आपल्या डावात 9 धावा करताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावा पूर्ण करण्याची किमया साधली. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. या सामन्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 सामन्यांमध्ये 51 च्या सरासरीने 1991 धावा केल्या होत्या आणि 2000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 9 धावांची गरज होती. त्याने भारतीय डावाच्या 27व्या षटकात आपल्या 9 धावा पूर्ण केल्या आणि 2000 धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी केवळ सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून ही कामगिरी करता आली होती आणि आता या यादीत पुजाराच्या नावाचाही समावेश झाला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 2000 हून अधिक धावा करणारा चेतेश्वर पुजारा सहावा फलंदाज ठरला आहे.
अहमदाबाद कसोटीत 2000 धावा पूर्ण करणारा पुजारा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अशी कामगिरी करणारा सहावा फलंदाज ठरला. त्याच्या आधी पाच फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती, त्यात तीन भारतीय आणि दोन ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा समावेश होता. सचिन तेंडुलकर 3262 धावांसह अव्वल स्थानावर असून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रिकी पाँटिंग 2555 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण (2434) आणि राहुल द्रविड (2143) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. मायकेल क्लार्क 2049 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यानंतर त्याचा नंबर येतो.
सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पुजाराने निर्णायक प्रसंगी आपले सर्वोत्तम फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मोठी खेळी झालेली नाही. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये उजव्या हाताच्या फलंदाजाने 0, 31*, 1 आणि 59 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत पुजारा अहमदाबाद कसोटीत मोठी खेळी खेळण्यास नक्कीच प्राधान्य देईल.
#INDvAUS #पजरच #ऑसटरलयवरदध #मठ #वकरम #ह #परकरम #करणर #चथ #भरतय