- भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव करत मालिका 3-0 ने जिंकली
- प्रेक्षक नाचत आणि तिरंगा फडकावत स्टेडियमच्या बाहेर आले
- यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वर्ल्ड कप जीतेगा इंडिया’च्या घोषणा देण्यात आल्या.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडिया आता वनडे क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन टीम बनली आहे. टी-20 मध्ये भारत पहिल्यापासूनच नंबर वन संघ आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.
भारताचा सलग सातवा वनडे विजय
तिसर्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारताने एकदिवसीय मालिकाही जिंकली. याआधी टीम इंडियाने 1988 आणि 2010 मध्येही न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप केला होता. भारताचा हा सलग सातवा एकदिवसीय विजय आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने तीन एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली आहे.
385 धावांची मोठी धावसंख्या
होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने नऊ गड्यांच्या मोबदल्यात 385 धावा केल्या. शुभमन गिलने 78 चेंडूत 112 धावा केल्या तर रोहित शर्माने 85 चेंडूत 101 धावा केल्या. या दोघांशिवाय हार्दिक पांड्यानेही चांगली फलंदाजी केली. त्याने 38 चेंडूत 54 धावा केल्या. विराट कोहलीला आज चालता आले नाही. त्याला केवळ 36 धावा करता आल्या.
किवी संघ 295 धावांवर सर्वबाद झाला
न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 41.2 षटकांत 295 धावांत गारद झाला. डेव्हन कॉनवेने 138 धावांचे शतक झळकावले. मात्र आपल्या संघाला विजय मिळविता आला नाही. कॉनवेशिवाय हेन्री निकोल्सने 42 आणि मायकेल ब्रेसवेलने 26 धावा केल्या.
स्टेडियमवर जल्लोष
सामना संपताच होळकर स्टेडियमबाहेर जल्लोष सुरू झाला. प्रेक्षक नाचत आणि तिरंगा फडकावत स्टेडियमच्या बाहेर आले. चाहते भारत माता की जय आणि वर्ल्ड कप जीतेगा इंडियाच्या घोषणा देत होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
#हळकर #सटडयमवर #टम #इडयन #इतहस #रचल #इदरमधय #वजय #सजर #कल