- रोनाल्डो जगातील केवळ पाचवा खेळाडू, अल-नासेर क्लबने 4-0 असा विजय मिळवला
- पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे
- तसेच त्याच्या क्लब कारकिर्दीत 500 गोलांचा जादुई टप्पा पार केला
पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आपल्या क्लब कारकिर्दीत 500 गोलांचा जादुई टप्पाही पार केला. ही कामगिरी करणारा तो जगातील केवळ पाचवा फुटबॉलपटू ठरला आहे. याआधी ब्राझीलचे पेले आणि रोमॅरियो, फ्रान्सचे पुस्कस आणि चेक प्रजासत्ताकचे जोसेफ बिकान या महान खेळाडूंनी हे यश संपादन केले आहे. रोनाल्डोने त्याच्या नवीन क्लब अल-नासेरसाठी अब्दुल अझीझ स्टेडियमवर अल वेहदा विरुद्ध चार गोल करून त्याच्या क्लबच्या गोलची संख्या 500 पेक्षा जास्त केली. रोनाल्डो फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही आहे.
सौदी प्रो-लीग फुटबॉलमध्ये, रोनाल्डोने अल-नासेरकडून खेळताना पहिला गोल करून 500 गोलचा टप्पा गाठला. त्यानंतर त्याने आणखी तीन गोल केले. त्याच्या क्लबने हा सामना 4-0 असा जिंकला. रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडसाठी 13, रिअल माद्रिदसाठी 31, जुव्हेंटससाठी 781, स्पोर्टिंग लिस्बनसाठी तीन आणि अल-नासरसाठी पाच गोल केले आहेत. पाच वेळा बॅलन डी’ओर पुरस्कार विजेत्या रोनाल्डोने गेल्या डिसेंबरमध्ये अल-नासेर क्लबसोबत करार केला आणि त्याला $200 दशलक्ष दिले गेले. तो संघाचा कर्णधार देखील आहे आणि अल-नासेर क्लब 16 सामन्यांनंतर लीगमध्ये अव्वल आहे.
#रनलडन #कलब #गलच #टपप #पर #कल