- दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ रायपूरला पोहोचला आहे
- खेळाडूंना पाहण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती
- शुभमन-ईशान किशन स्टायलिश लूकमध्ये दिसले
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ रायपूरला पोहोचला आहे. दरम्यान, संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे शुभमन गिल आणि इशान किशन खूपच स्टायलिश लूकमध्ये दिसले.
टीम इंडिया या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे
एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबाद येथे खेळला गेला, ज्यामध्ये शुभमन गिलचे शानदार द्विशतक आणि मोहम्मद सिराजच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव केला. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असून दुसऱ्या सामन्यात संघ जिंकल्यास मालिकाही ताब्यात घेईल, तर दुसरीकडे न्यूझीलंड संघावर विजयाचे दडपण असेल.
शुभमन-ईशानचा स्टायलिश अवतार
आगामी सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार आणि द्विशतक करणारा शुभमन गिल आणि इशान किशन यांच्यावर असतील. सामन्यापूर्वी संघ रायपूरला पोहोचल्यावर संघाचे भव्य स्वागत करण्यात आले. संघाचे स्वागत करण्यासाठी आणि आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित होते. युवा स्टार शुभमन गिल-ईशान किशनची क्रेझ चाहत्यांमध्ये सतत वाढत आहे. दोन्ही खेळाडू स्टायलिश अवतारात दिसले.
#रयपरमधय #टम #इडयच #भवय #सवगत #वमनतळवर #चहतयच #गरद