- बुमराहला T20 विश्वचषकही खेळता आला नव्हता
- पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर होता
- श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना १० जानेवारीला होणार आहे
भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बुमराहचा संघात समावेश केला आहे.
श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिली टी-२० मालिका खेळली जाणार असून त्यातील पहिला सामना आज होणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हे तीन वनडे 10, 12 आणि 15 जानेवारीला खेळवले जातील.
पहिला एकदिवसीय सामना 10 जानेवारीला होणार आहे
29 वर्षीय जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकालाही तो मुकला. तो बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये होता, पण आता NCA ने त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे. आता तो एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात सामील होणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग
#भरतय #सघसठ #आनदच #बतम #बमरहच #शरलकवरदधचय #वनड #सघत #पनरगमन