- भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला
- दुभाजकाला धडकल्याने क्रिकेटपटूची मर्सिडीज कार पूर्णपणे जळून खाक झाली
- डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुभाजकाला धडकल्याने क्रिकेटपटूची मर्सिडीज कार पूर्णपणे जळून खाक झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
नवी दिल्लीहून उत्तराखंडमधील रुरकीकडे निघालेली ऋषभ पंत यांची मर्सिडीज कार आज पहाटे ५.१५ वाजता नरसन सीमेवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने, वाटसरूंनी विंडस्क्रीन तोडून पंत यांना कारमधून बाहेर काढले. त्यावेळी ते कारमध्ये एकटेच होते.
जखमी क्रिकेटपटूला रुडकी येथील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, क्रिकेटरच्या शरीरावर फारशी जखम नाही, पण त्याच्या एका पायात फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. आता त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले आहे.
#भरतय #करकटपट #ऋषभ #पतच #अपघत #कस #झल #मरसडज #जळन #मतय