भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसर्या आणि अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव करत वनडे मालिका 3-0 अशी खिशात घातली. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर 391 धावांचे लक्ष्य ठेवले होते ज्यासमोर श्रीलंकेचा संघ 22 षटकांत केवळ 73 धावांत गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी करताना चार बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन बळी घेतले.
#भरतन #तसऱय #एकदवसय #समनयत #शरलकच #३१७ #धवन #परभव #करत #मलक #३० #न #जकल