- सामन्याच्या पहिल्या दिवशी शॉने 235 चेंडूत द्विशतक झळकावले
- प्रथम श्रेणी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक
- 164 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या
टीम इंडियासाठी पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. शॉ सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवत आहे, तरीही बीसीसीआयने त्याचा टीम इंडियाच्या संघात समावेश केलेला नाही आणि या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबई आणि आसाम यांच्यातील रणजी करंडक सामना आसाममधील अमिंगॉन क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी शॉने 235 चेंडूत द्विशतक झळकावले. त्याचे हे प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील दुसरे द्विशतक आहे.या डावात त्याने 28 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
23 वर्षीय पृथ्वीने उपाहारापूर्वी 107 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर 164 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. 2023 ची सुरुवात पृथ्वीसाठी चांगली झाली आहे. यावेळी पृथ्वीने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्याही पार केली आहे. याआधी, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 202 धावा होती जी त्याने मागे टाकली आहे.
शॉला टीम इंडियात स्थान का मिळत नाही, याचे उत्तर कोणाकडे नाही, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची बॅट ज्या पद्धतीने चालली आहे, त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी नक्कीच मिळायला हवी. शॉने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
शॉ जुलै 2021 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पाच कसोटींच्या नऊ डावांमध्ये, शॉने 42.38 च्या सरासरीने आणि 86.04 च्या स्ट्राइक रेटने 339 धावा केल्या. शॉच्या खात्यात शतक आहे, तर त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. शॉने मुशीर खानसोबत पहिल्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करून मुंबईला दमदार सुरुवात करून दिली.
#पथव #शचय #चडत #कललय #धवन #नवड #समतल #धकक #दल