- इंग्लंडकडून बटलरने नाबाद 94 आणि ब्रूकने 80 धावा केल्या
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीची परवानगी दिली
- इंग्लंडच्या संघाला 50 षटकांत 342 धावांची मोठी मजल मारता आली
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 50 षटकात 7 विकेट गमावत 342 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 27 षटकात 2 बाद 174 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून टेंबा बावुमा 102 चेंडूत 109 धावा करून बाद झाला. क्लिंटन डी कॉक 31 धावांवर बाद झाला तर ड्यूसेन 34 धावांवर खेळत होता. तत्पूर्वी, जॉस बटलर आणि हॅरी ब्रूक यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाला 50 षटकांत 342 धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीची परवानगी दिली. पाहुण्या संघाने सावध सुरुवात केली पण त्यानंतर बटलरने नाबाद 94 आणि ब्रुकने 80 धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीनेही 44 चेंडूत 51 धावा केल्या.
#दसऱय #एकदवसय #समनयत #इगलडचय #मठय #धवसखयवरदध #बवमच #झजणर #शतक