- मार्शने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 126 सामने खेळले
- 38 कसोटीत 2265, 73 एकदिवसीय सामन्यात 2,773, 15 T20 मध्ये 255 धावा केल्या.
- 2021-22 मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला शेफील्ड शिल्डमध्ये चॅम्पियन बनवले
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्शने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2000-01 हंगामात शेफील्ड शिल्डसह प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मार्शने पश्चिम ऑस्ट्रेलियासाठी 20 शतके आणि 43 अर्धशतकांसह 8,347 धावा केल्या. शेफिल्ड शिल्डमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाकडून 126 सामने खेळले
मार्शने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 126 सामने खेळले. मार्शने 38 कसोटीत 2265 धावा, 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2,773 धावा आणि 15 टी-20 सामन्यांमध्ये 255 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत सहा शतके आणि वनडेत सात शतके झळकावली. मार्शने 2021-22 मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आणि 1998-99 नंतर त्यांच्या संघाचे पहिले शेफील्ड शिल्ड विजेतेपद मिळवले.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मजबूत रेकॉर्ड
एकूण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, मार्शने 183 सामन्यांतून 234 डावांमध्ये 41.20 च्या सरासरीने 12,032 धावा केल्या, त्यात 32 शतके आणि 58 अर्धशतके झळकावली. मार्शने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जून 2019 मध्ये खेळला होता. मार्शने 15 जून रोजी ओव्हल मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात फक्त तीन धावा केल्या.
#ऑसटरलयन #करकटर #शन #मरशन #परथम #शरण #करकटल #अलवद #महटल #आह