- महिला टी-२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे
- भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये हा सामना होणार आहे
- भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे
दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या महिला T20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज (गुरुवार) 23 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर होणार आहे. भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सामन्यात भारताचा इरादा ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा असेल. मात्र, दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घेऊया.
टीम इंडियाचा वर्ल्डकपपर्यंतचा प्रवास
आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. भारताने 4 पैकी 3 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला संघाने टी-20 विश्वचषकाची विजयाने सुरुवात केली. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. तर चौथ्या सामन्यात भारतीय महिला संघाने आयर्लंडचा 5 धावांनी पराभव करत अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले आहे.
ऑस्ट्रेलिया अपराजित राहिला
महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा महिला संघ अपराजित राहिला. दरम्यान, कांगारू महिला संघाने त्यांच्या गटात न्यूझीलंडचा 97 धावांनी, बांगलादेशचा 8 गडी राखून, श्रीलंकेचा 10 गडी राखून आणि दक्षिण आफ्रिका महिला संघाचा 6 विकेट राखून पराभव केला. अशा प्रकारे, ऑस्ट्रेलियन महिला संघ एकही सामना न गमावता महिला T20 विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: एलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), एलिस पेरी, ऍशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, मेगन शुट, डी’आर्सी ब्राउन.
#आज #भरतऑसटरलय #उपतय #फरच #समन #जणन #घय #दनह #सघच #सभवय #पलइग #इलवहन